अभाविपतर्फे नि:शुल्क कोरोना लसीकरण नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:42+5:302021-04-02T04:29:42+5:30

बल्लारपूर: भारत सरकारने देशव्यापी सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाची मोहीम संपूर्ण भारतभर सुरू आहे. त्यातील दुसरा महत्वपूर्ण टप्पा म्हणजे ४५ ...

Free Corona Vaccination Registration by Abhavipa | अभाविपतर्फे नि:शुल्क कोरोना लसीकरण नोंदणी

अभाविपतर्फे नि:शुल्क कोरोना लसीकरण नोंदणी

बल्लारपूर: भारत सरकारने देशव्यापी सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाची मोहीम संपूर्ण भारतभर सुरू आहे. त्यातील दुसरा महत्वपूर्ण टप्पा म्हणजे ४५ वयोगटावरील नागरिकांना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा बल्लारपूरतर्फे गेल्या चार दिवसांपासून शासकीय रुग्णालय बल्लारपूर येथे नि:शुल्क कोरोना लसीकरण नोंदणी व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

यावेळी ४५ वयोगटावरील नागरिकांची नोंदणी करून त्यांना लसीकरणाविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद यावेळी मिळत आहे. या शिबिराकरिता बल्लारपूर नगरमंत्री आशुतोष द्विवेदी, सहनगरमंत्री आदित्य दुबे, महाविद्यालय प्रमुख अनिकेत अंदरस्कर,महाविद्यालय सहप्रमुख तरुण शर्मा,कार्यालय मंत्री हर्षल निवळकर, तंत्रशिक्षण प्रमुख यश पुरी व अन्य कार्यकर्ते सहकार्य करीत आहे. यावेळी बल्लारपूर शहरातील सर्व नागरिकांनी कोरोना लसीकरण अवश्य करावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे नागरिकांना केले आहे.

Web Title: Free Corona Vaccination Registration by Abhavipa