विकासाच्या आश्वासनाने जनतेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:04 IST2018-09-05T23:03:47+5:302018-09-05T23:04:05+5:30
जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपाला निवडून दिले. पण घोर निराशा झाली आहे. हे सरकार जाती व धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. बुधवारी घेण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चा व मेळाव्यात ते बोलत होते.

विकासाच्या आश्वासनाने जनतेची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपाला निवडून दिले. पण घोर निराशा झाली आहे. हे सरकार जाती व धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. बुधवारी घेण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चा व मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आयोजक माजी आमदार सुदर्शन निमकर, खासदार मधुकर कुकडे, आमदार प्रकाश गजभिये, ख्याजा बेग, माजी मंत्री रमेशचंद्र्र बंग, अनिल देशमुख, मोरेश्वर टेमुर्डे, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, अॅड. बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, बेबी उईके, नितीन भटारकार, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, निलेश ताजणे, हरी झाडे, अरूण डोहे, मनोज धानोरकर, कैलास राठोड आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, मागील चार वर्षांपासून केद्रांत व राज्यात सत्तेवर असलेले सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेने सावध राहावे, असेही त्यांनी नमुद केले.
माजी आमदार निमकर यांनी विधानसभा क्षेत्रात तालुक्यातील विविध समस्यांकडे भाषणातून लक्ष वेधले. खासदार कुकडे व अन्य मान्यवरांनीही सरकारच्या जनहित धोरणांचा निषेध केला. मोर्चात तालुक्यातून बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला उपस्थित होते.