शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

आणखी चार मुलींची लैंगिक शोषणाची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 5:15 AM

इन्फंट जिजस सोसायटीच्या दोन मुलींवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून अशाच प्रकारची तक्रार नोंदविली.

राजुरा (चंद्रपूर) : येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या दोन मुलींवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून अशाच प्रकारची तक्रार नोंदविली. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आधीच छबन पचारे याला अटक केली आहे. आज सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण विरुटकर याला अटक केली. तसेच वसतिगृह अधिक्षिकेसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.इन्फंट जिजस सोसायटीच्यावतीने राजुरा येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह आठ-दहा वर्षांपासून सुरू आहे. येथील दोन मुलींना पोटात दुखत असल्याच्या कारणावरून ६ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीअंती त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब १३ एप्रिल रोजी उजेडात आली.पोलिसांनी कलम ३७६ (अ,ब) व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन पचारे या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याला सवेतूनही निलंबित केले आहे. आता आणखी चार मुलींनी तक्रार दिल्याने प्रकरण गंभीर झाले आहे.>ओआरएसमधून देत होते गुंगीचे औषध?शालेय मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नेमके काय आहे. याबाबत अद्यापही पोलिसांनी खुलासा केलेला नाही. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण झाल्यानंतर मुलींना ओआरएसची पावडर दिली जात होती. त्या पावडरमध्येच गुंगीच्या गोळ्या टाकून दिल्या जात असल्याचा तपासातून पुढे आले आहे.>कडक कारवाई करा - पालकमंत्री मुनगंटीवारया प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी व अहवाल तातडीने कळविण्यात यावा, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळविले आहे.