शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

जाळ्यात अडकून चार कमलपक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:20 PM

निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलावामध्ये सध्या दिसत आहे. स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोनाची ओळख आहे. या तलावात आता शिंगाळ्याची वेल लावण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलावामध्ये सध्या दिसत आहे. स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोनाची ओळख आहे. या तलावात आता शिंगाळ्याची वेल लावण्यात आली आहे. तलावाचा काही भाग हा वनविभाग व सिंचन विभागाचा आहे. शिंगाळ्याचे वेल वाचविण्यासाठी मासोळ्यांचे जाळे लावण्यात आले आहे, त्या जाळ्यात अडकून चार ‘ब्रॉन्झ विंग जकाना’ म्हणजेच सोनेरी पंखाचा कमलपक्षी (पाणमोर) यांचा मृत्यू झाला.चंद्रपुरातील काही पक्षी मित्र रविवारी पक्षी निरीक्षणासाठी जुनोना तलाव परिसरात गेले असता दूरवर मासोळ्यांचे जाळे हे थोड्या थोड्या वेळाने हलताना दिसत होते. ते जवळ गेले असता एक कमलपक्षी जाळ्यात अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हेशन सोसायटीचे शशांक मोहरकर, करण तोगट्टीवार पाण्यात उतरले. पाणी खोल असल्याने करण तोगट्टीवार यांनी पोहून जाण्याचा प्रयत्न केला. पण वेल व कचरा जास्त असल्याने ते अपयशी झाले. ते पाण्यात उतरल्यावर त्यांना जाळ्यात आणखी तीन कमलपक्षी अडकल्याचे दिसले. चारही पक्ष्यांचा यात मृत्यू झाला.