निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:40+5:302021-01-13T05:11:40+5:30
शेगाव : जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेगाव पोलिसांनी चारगाव परिसरात धाड टाकून ३८ पेट्या देशी दारू जप्त केली. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार लाखांची दारू जप्त
शेगाव : जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेगाव पोलिसांनी चारगाव परिसरात धाड टाकून ३८ पेट्या देशी दारू जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. प्रकाश रामकृष्ण हिवरे (४५, रा. चारगाव, बु), संदीप हरिदास माथनकर (२८, रा. गुजगव्हाण), भास्कर श्यामराव जांभुळे (४७, रा. वायगाव( असे अटकेतील आरोपींची नाव आहेत.
चारगाव परिसरात देशी दारू साठवून ठेवल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड टाकून ३८ पेट्या देशी दारू व तीन लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक शिरसागर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, महादेव सरोदे, महेश गावतुरे, बाळासाहेब कामले, निखिल कौरासे, किशोर पिरके आदींनी केली.