कार अपघातात चारजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:41 IST2017-10-27T23:41:36+5:302017-10-27T23:41:49+5:30
नागपूर ते चंद्रपूर मार्गावरील कोंढा फाट्याजवळ कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली़

कार अपघातात चारजण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : नागपूर ते चंद्रपूर मार्गावरील कोंढा फाट्याजवळ कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली़
प्रणव पौनीकर, सुशील सोनचिकटे, अरुण मारबते, संजय मारबते रा़ नागपूर अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या मार्गावर नेहमी अपघात होत असतात़ जडवाहतूक भरधाव वेगाने सुरू असल्याने अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत़ दोन आठवड्यांपूर्वी मोठा अपघात झाला होता़ त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आहे़ अपघातातील जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली़