बालकाचे अपहरण करणाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी

By Admin | Updated: November 15, 2015 00:37 IST2015-11-15T00:37:39+5:302015-11-15T00:37:39+5:30

नागभीड लगत असलेल्या तुकूम येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तीन तासानंतर त्याला गावातच आणून सोडणाऱ्या आरोपीला येथील...

Four-day police closure to kidnap kidnapper | बालकाचे अपहरण करणाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी

बालकाचे अपहरण करणाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी

कारण गुलदस्त्यात : तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणार तपासणी
नागभीड : नागभीड लगत असलेल्या तुकूम येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तीन तासानंतर त्याला गावातच आणून सोडणाऱ्या आरोपीला येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तुकुम येथील मंथन चौधरी (७) आणि त्याचा चुलतभाऊ प्रथमेश (११) हे गावानजीकच्या राज्य महामार्गावर शौचविधीसाठी गेले असता डोंगरगाव (नागभीड) येथील गणेश पांडुरंग बोरकर (२५) या युवकाने मंथनला चल तुला गावात सोडून देतो, असे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसविले व पळ काढला. प्रथमेशने ही गोष्ट गावात सांगितल्यानंतर गावकरी आरोपीच्या मागावरच होते.दरम्यान, तीन तासानंतर आरोपी गणेशने मंथनला गावच्या शाळेजवळ आणून सोडत असताना गावकऱ्यांनी त्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. शनिवारी पोलिसांनी आरोपीला येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली.
अपहृत बालकाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण येथील वैद्यकीय तपासणी काहीच निष्पन्न न झाल्याने तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Four-day police closure to kidnap kidnapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.