राहुल गिरी खून प्रकरणी चौघांना अटक
By Admin | Updated: November 2, 2015 00:55 IST2015-11-02T00:55:25+5:302015-11-02T00:55:25+5:30
स्थानिक भिवापूर वॉर्डातील एका महिलेच्या घरात थांबून असलेल्या राहुल गिरी या युवकाच्या हत्येप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

राहुल गिरी खून प्रकरणी चौघांना अटक
चंद्रपूर: स्थानिक भिवापूर वॉर्डातील एका महिलेच्या घरात थांबून असलेल्या राहुल गिरी या युवकाच्या हत्येप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांना यश प्राप्त झाले.
२६ आॅक्टोबर रोजी घुग्घूस येथील रहिवासी असलेल्या राहुल गिरी याचा भिवापूर वॉर्डातील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या घरात खून करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना मृत राहुलच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या शंकेनंतर पोलिसांनी शनिवारी शिवा नामक युवकाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी तीन आरोपींना पोलिसांनी रविवारी अटक केली. मारेकरी हे मृत राहुलचे मित्र होते. मात्र पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांचा वाद सुरू होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)