एटीएम फोडणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:42 AM2019-08-21T00:42:10+5:302019-08-21T00:42:41+5:30

येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा पर्यंत करणाºया चौघांना सावली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशिल कुडवे, अमोल भडके, शुभम दुधे, संदेश खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका विधीसंघर्ष बाल आरोपीचाही समावेश आहे.

Four arrested for breaking ATMs | एटीएम फोडणाऱ्या चौघांना अटक

एटीएम फोडणाऱ्या चौघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा पर्यंत करणाºया चौघांना सावली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सुशिल कुडवे, अमोल भडके, शुभम दुधे, संदेश खोब्रागडे अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका विधीसंघर्ष बाल आरोपीचाही समावेश आहे. शहरातील एटीएम फोडल्याची तक्रार दीपक मधुकर नामेवार यांनी पोलिसांकडे केली होती.
ठाणेदार खाडे यांनी बँकेचे सीसीटीव्ही फूटेज तपासून संशयित आरोपी सुशिल कुडवे याला ताब्यात घेतले. त्याने अन्य आरोपींची नावे घेताच अन्य तिघांनाही पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

घरफोडी करणारा एलसीबीच्या जाळ्यात
चंद्रपूर : शहरातील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ५९ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपी रोहित आदेश ईलमकर, समता नगर रा. दुर्गापूर असे आरोपीचे नाव आहे. बाबा गोपाळ बनकर हे तिर्थयात्रेला गेले होते. दरम्यान घरफोडी करून चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप असा एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा माल लंपास करण्यात आला. या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकोटे व पथकातील पंडीत वºहाटे, संजय आतकुलवार यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Four arrested for breaking ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.