शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी चार अपघात; चिमुकलीसह सात जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:46 IST

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा आणि मूल परिसरात घडलेल्या चार भीषण अपघातांनी जिल्ह्यावर शोककळा पसरवली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा आणि मूल परिसरात घडलेल्या चार भीषण अपघातांनी जिल्ह्यावर शोककळा पसरवली. या वेगवेगळ्या घटनांत पाच वर्षाच्या चिमुकलीसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. अचानक ओढावलेल्या या दुर्घटनांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसेगाव-चिचपल्ली फाट्याजवळ पहिली दुर्घटना घडली. उपचारासाठी चंद्रपूरकडे दुचाकीने येत असताना अरुण देविसाद पिपरे (३५) पत्नी व तीन वर्षाच्या मुलासह रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी भरधाव क्रेनने धडक दिल्याने अरुण पिपरे यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी काजल पिपरे व चिमुकला अश्विक पिपरे (३) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर क्रेनचालक पसार झाला. पोलिसांनी बीएनएस २८१, १०६ (१), १२५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गोगाव-सायगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी

ब्रह्मपुरी : लाकूड कटाईसाठी तळोधी येथे गेलेले सात मजूर परत येत असताना गोगाव-सायगाव मार्गावर ट्रॅक्टर एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर सहा ते सात फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात प्रवीण प्रकाश भोयर (३०) व शिवाजी बळीराम दोडके (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रह्मदास भजगवळी व नीलकंठ जरादे हे गंभीर जखमी, तर दोघे किरकोळ जखमी झाले.

अवैध रेती वाहतुकीचा बळी; मजूर ठार

वरोरा : शेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव जंगल परिसरात अवैध रेती वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टर चालकाने वनविभागाची गाडी पाहताच रेती खाली टाकली. यावेळी रेतीवर झोपलेला प्रवीण वसंत दडमल (३५) रेतीखाली दबला गेला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अवैध वाहतुकीमुळे पुन्हा एकदा एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे.

वाहनाने पाच वर्षीय चिमुकलीला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता राको

मूल : खेडीवरून जुनासुर्लाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा एस गाडीने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या चिमुकलीला चिरडल्याने चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भवराळा येथे गुरुवारी (दि.१५) सकाळी ८:३० वाजता दरम्यान घडली. रुद्रप्रिया सोमेश्वर सरपाते (वय ५, रा. भवराळा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून तत्काळ गतिरोधक करण्यात यावे, अशी मागणी केली. भवराळा येथील सोमेश्वर सरपाते यांची मुलगी रुद्रप्रिया सकाळी खेडी जुनासुर्ला मार्गावरील भवराळा गावात रस्त्याच्या कडेला खेळत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur District Sees Four Accidents, Seven Dead Including Child

Web Summary : Four tragic accidents in Chandrapur district claimed seven lives, including a five-year-old girl. The incidents occurred in Brahmapuri, Ballarpur, Warora and Mul areas, leaving six others seriously injured and families devastated. Causes included a speeding crane, tractor malfunction, illegal sand transport, and reckless driving.
टॅग्स :Accidentअपघात