पालकमंत्र्यांच्या हस्ते नियोजन भवनाची पायाभरणी
By Admin | Updated: January 15, 2016 01:42 IST2016-01-15T01:42:26+5:302016-01-15T01:42:26+5:30
चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन नियोजन भवनाची पायाभरणी आज गुरुवारी ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते नियोजन भवनाची पायाभरणी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन नियोजन भवनाची पायाभरणी आज गुरुवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ व तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते. नियोजन भवनाच्या कोनशिलेचे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी जगन्नाथ बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन भवन बांधण्यात येणार आहे. या दोन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर सभागृह व मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकरिता सभागृह व कक्ष असणार आहे. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन कार्यालय राहणार आहे. या नियोजन भवनात लिफ्ट, उच्च दर्जाचे ध्वनीक्षेपण यंत्रणा, व्हिडीओ डिस्प्ले व्यवस्था, वातानुकूलीत यंत्रणा, विद्युतीकरण व सभागृहासाठी तसेच कार्यालयासाठी उत्तम फर्निचरची व्यवस्था करण्यात येणार आहे. इंटेरियरचे काम उत्तम दर्जाचे असावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)