ऐकेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान; गोंडपिपरीत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:21+5:302021-07-07T04:35:21+5:30

लोकमत रक्ताचं नातं लोकमत समूहाअंतर्गत, सुरेशराव चौधरी आप्त परिवार तथा लो रक्तदान शिबिर खैरे कुणबी समाज भवन गोंडपिपरी सभागृहात ...

Forty-one blood donors donated blood; Spontaneous response to blood donation in Gondpipari | ऐकेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान; गोंडपिपरीत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐकेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान; गोंडपिपरीत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत रक्ताचं नातं लोकमत समूहाअंतर्गत, सुरेशराव चौधरी आप्त परिवार तथा लो रक्तदान शिबिर खैरे कुणबी समाज भवन गोंडपिपरी सभागृहात पार पडले. शिबिराला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, तहसीलदार के.डी. मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे उपस्थित होते. शिबिरामध्ये तालुक्यातील ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकमत समूहाने रक्ताचं नातं ही मोहीम सुरू केली. लोकमतने उचललेल्या कार्याला चौधरी परिवाराची मोलाची साथ लाभली असून लोकमतने सुरू केलेलं कार्य प्रशंसनीय आहे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार के.डी. मेश्राम, ठाणेदार धोबे, सपना चौधरी, राजू चंदेल, बबन निकोडे, प्रा. हागे पाटील, प्रा. बांदुरकर आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश चौधरी यांचा त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. राहुल चौधरी, विपीन चौधरी, अखिल चौधरी, गणपत चौधरी, आनंद झाडे, बंडू सोनवणे, पवन वडपल्लीवार, विशाल मडावी, शंकर बोरकुटे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी नीलेश झाडे, चंद्रजित गव्हारे, राजेश माडूरवार यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

060721\img-20210703-wa0019.jpg

रक्तदान शिबीर

Web Title: Forty-one blood donors donated blood; Spontaneous response to blood donation in Gondpipari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.