आयुधनिर्माणी चांदातर्फे स्वच्छता पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:42 IST2020-12-16T04:42:22+5:302020-12-16T04:42:22+5:30
भद्रावती : येथील आयुधनिर्माणी वसाहतीत महाप्रबंधक राजीव पुरी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या स्वच्छता ...

आयुधनिर्माणी चांदातर्फे स्वच्छता पंधरवडा
भद्रावती : येथील आयुधनिर्माणी वसाहतीत महाप्रबंधक राजीव पुरी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या स्वच्छता पंधरावाड्याचा समारोप करण्यात आला.
स्वच्छता पंधरवाड्यात आयुधनिर्माणीतील अधिकारी, कामगार संघटना, जेसीएम सदस्य यांना महाप्रबंधक राजीव पुरी यांनी स्वच्छतेची दिली. स्वच्छता पंधरवाड्यात वसाहतीमधील सार्वजनिक ठिकाणावरील शॉपिंग मॉल पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. तसेच कार्यालयातील जुन्या फाईल फर्निचरची सफाई करून व्यवस्थित ठेवण्यात आले. यावेळी संकलित केलेला कचरा एकत्र करून नगरपालिकेच्या विजासन येथील कचरा डेपोमध्ये पाठविण्यात आला. निर्माणी परिसरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसचे वसाहतीत धुरांडा करण्यात आला. निर्माणीतील दवाखान्यात प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल, या विषयावर शिबिर घेण्यात आले. शिबर समारोपाच्या दिवशी पवन क्रीडा स्टेडियम येथे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयामध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी महाप्रबंधक राजीव पुरी, अप्पर महाप्रबंधक जी. एस. आर प्रभाकर, एस. के. भोला, राकेश कुमार ओझा, विजय मित्तल आदींनी प्रयत्न केले.