चंद्रपुरातील माजी प्रांत प्रचारक संतोष दीक्षित यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:51 IST2018-06-20T16:48:18+5:302018-06-20T16:51:08+5:30
येथील समाधी वॉर्डातील रहिवासी संतोष दीक्षित यांनी स्वत:च्या घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

चंद्रपुरातील माजी प्रांत प्रचारक संतोष दीक्षित यांची आत्महत्या
ठळक मुद्देमुलीच्या मृत्यूमुळे झाले होते व्यथित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील समाधी वॉर्डातील रहिवासी संतोष दीक्षित यांनी स्वत:च्या घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत प्रचारक व धर्म जागरण समितीचे अध्यक्ष होते.
संतोष दीक्षित यांची पाच वर्षांची मुलगी समिधाला कुलरचा शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. मुलीच्या विरहात आपण गोळ्या खाऊन आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, अशी माहिती चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस. एस. भगत यांनी ‘लोकमत’ला दिली.