शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'खनिज निधी दीर्घकालीन जलपुनर्रभरणासाठीच वापरा' माजी खासदार नरेश पुगलिया यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:13 IST

नरेश पुगलिया यांची मागणी: वेकोलिच्या खाणींमुळे इरई व झरपट नद्यांचे अस्तित्व धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूरकर व परिसरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन इरई तसेच झरपट नदीचे अस्तित्व टिकावे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर लवकरच अंतिम सुनावणी होईल. मात्र, प्रशासनाने जिल्हा खनिज विकासचा वापर अन्यत्र नव्हे, तर या दोन नद्यांच्या जलपुनर्रभरणासाठीच करावा, अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केली.

खासदार पुगलिया यांनी इरई व झरपट नदीच्या अस्तित्वासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोणती निरीक्षणे नोंदविली. महानगर पालिका, जिल्हा प्रशासन व वेकोलिला कोणते दिशानिर्देशन दिले, याबाबतची तपशीलवार माहिती दिली. पुगलिया म्हणाले, वेकोलिवगळता आतापर्यंत मनपा व जिल्हा प्रशासनाने चुका मान्य करून प्रतिबंधात्मक पाऊल उचलले. मात्र, वेकोलिचा आडमुठेपणा दूर झाला नाही. वेकोलिकडून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा दिला जातो. याचा अर्थ नागरिकांना प्रदूषणाच्या खाईत ढकलायचे आणि इरई व झरपट नद्यांचे अस्तित्व संपवायचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेकोलिने बंद कोळसा खाणींबाबत प्रतिबंधात्मक पाऊल उचलले नाही. वर्धा व्हॅली परिसरात खनिज विकास निधीतून तीन बंधारे बांधावे, वर्धा व्हॅली परिसरात तीन बंधारे बांधावे, जिल्हा प्रशासनानेही खनिज विकास निधी किरकोळ कामांसाठी खर्च करण्याऐवजी जलधोरण व पर्यावरणाच्या पायाभूत दीर्घकालीन कामांसाठीच वापरावा. यासाठी जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी खासदार पुगलिया यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अशोक नागपुरे, देवेंद्र बेले उपस्थित होते. 

वेकोलिने मागितला खनिज निधीचा हिशेबसीएलएल निधीसोबतच स्वामित्व व जिल्हा खनिज निधीच्या आधी डरई व झरपट नदीला प्रदूष णमुक्त करण्यासाठी मोठा निधी दिल्याचा दावा वेकोलिच्या वकिलाने न्यायालयात केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या शपथपत्रानुसार, प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या प्रतिबं धात्मक खर्चासंदर्भात चार आठवड्यांत विस्तृत अहवाल द्यावा. वेकोलिने दिलेल्या योगदानाचा व किती निधी, कोणत्या कारणांसाठी वापरला, याची माहिती देण्याचा आदेश न्यायमूर्ती न्यायमूर्ती भारती डांगरे व अभय मंत्री यांनी दिला.

२० ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अॅड. एस. भांडारकर यांच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुनावणी झाली. त्यावेळी सत्यशोधन समितीचा अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातील दोन मुद्द्यांवर न्यायालयाने प्रकाश टाकला. झरपट व इरई नदी प्रदूषणाचा निकाली काढण्यासाठी वर्धा नदीत पाणी पंप लावणे अव्यवहार्य असल्याचे सांगितले. तेव्हा दीर्घकालीन व आठ अल्पकालीन उपाययोजना अंमलात का आणल्या नाही, याबाबतही ताशेरे ओढले. येत्या २० ऑक्टो. २०२४ रोजी न्यायमूर्ती भारती डांगरे व अभय मंत्री या द्विसदस्यीय बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी होईल. दोनही नद्या वाचविणे व लोकांच्या हितासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही माजी खासदार पुगलिया यांनी सांगितले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर