माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:17+5:302021-07-22T04:18:17+5:30
नागभीड : राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांचा नागभीड येथे रुक्मिणी सभागृहात ...

माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांचा सत्कार
नागभीड : राज्य मागास वर्ग आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल माजी न्यायमूर्ती चंद्रालाल मेश्राम यांचा नागभीड येथे रुक्मिणी सभागृहात ढिवर-भोई-केवट समाज सेवा संघ तालुका शाखा नागभीड व वाल्मीकी पुरुष बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश डायरे, जिल्हा मच्छिमार संघाचे संचालक विजय नान्हे, ढिवर-भोई-केवट समाज सेवा संघ तालुका शाखा नागभीडचे अध्यक्ष गुलाबराव भानारकर,नागोराव भानारकर, नागोराव नान्हे, होमदेव मेश्राम, वाल्मीकी बचत गटाचे अध्यक्ष नीलकंठराव चांदेकर, दयाराम नान्हे, प्रकाश भानारकर, दिलीप भानारकर, प्रफुल्ल भानारकर, विलास दिघोरे, दिनकर डोंगरवार, हिवराज दिघोरे, अजय दिघोरे, सुनील मांढरे व गंगोत्री महिला बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन पराग भानारकर तर प्रास्ताविक गिरीश नगरे यांनी केले. आभार शांताराम नागापुरे यांनी मानले.
210721\img-20210721-wa0019.jpg
मेश्राम यांचा सत्कार करतांना