शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

चंद्रपूरचे माजी आमदार तथा ‘एन्काऊंटर’कार लोकनेते एकनाथ साळवे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 07:45 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार त्यांचे राजकीय गुरू होते. नक्षल चळवळीशी संबंधित त्यांची ‘एन्काऊंटर’ कादंबरी प्रचंड गाजली. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ असे दहा वर्षे त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. (Eknath Salve)

चंद्रपूर : चंद्रपूरचे माजी आमदार, ‘एन्काऊंटर’कार, ज्येष्ठ समाजसेवक ॲड. एकनाथ पांडुरंग साळवे (Eknath Salve) यांचे शनिवारी दुपारी १.२० वाजता वृद्धापकाळाने येथील बापटनगरातील निवासस्थानी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी येथून रविवारी सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. वर्धा नदीवरील पुलाजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा ॲड. जयंत साळवे व तीन मुलींसह स्नुषा, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (Former Chandrapur MLA Eknath Salve passes away)महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार त्यांचे राजकीय गुरू होते. नक्षल चळवळीशी संबंधित त्यांची ‘एन्काऊंटर’ कादंबरी प्रचंड गाजली. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ असे दहा वर्षे त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९७२ मध्ये ते लंडन येथे काॅमनवेल्थ पार्लमेंट सेमिनारमध्ये सहभागी झाले होते. १९७८ पासून त्यांनी चंद्रपूर-नागपूर कोर्टात वकिली केली. टाडा कायद्याखाली निरपराध आदिवासींना गोवण्यात येत असताना ॲड. साळवे यांनी एकही रुपया न घेता त्यांना न्याय मिळवून दिला.  आदिवासी, दलितांना सिंचनासाठी पाणी सत्याग्रह केला. त्यांनी १९९३ मध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.

 

टॅग्स :MLAआमदारVidarbhaविदर्भ