वनविभागाचे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:35+5:30
नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात दिसल्यास सर्वांनी आरडाओरडा करून त्या ठिकाणावरुन निघून जावे, आपल्यालाच मोहफुले व तेंदूपत्ता मिळाला पाहिजेत ही स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून एकट्याने जंगलात भटकू नये, ........

वनविभागाचे नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : काही दिवसानंतर मोहफुल वेचण्याचा आणि तेंदूपत्ता गोळा करण्याचा हंगाम सुरू होत आहे. त्याअनुषंगाने ब्रम्हपुरी वनविभागाच्या उत्तर व दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले असून जंगलव्याप्त परिसरातील गावांमध्ये जाहिरात व परिपत्रकाच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात दिसल्यास सर्वांनी आरडाओरडा करून त्या ठिकाणावरुन निघून जावे, आपल्यालाच मोहफुले व तेंदूपत्ता मिळाला पाहिजेत ही स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून एकट्याने जंगलात भटकू नये, झुडपात मोहफुले व तेंदूपत्ता असेल तर सावधानतेने त्या ठिकाणी जावे, पानवठा व तलावाच्या जवळपास जातांना सावधगिरी बाळगावी, अंधार असतांना जंगलात जाऊ नये, दिवस उजाडल्यानंतरच मोह फुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जावे आणि दुपार होण्यापूर्वीच परत यावे, वन्यप्राणी दिसल्यावर त्यांना इजा करू नये असे आवाहन उत्तर व दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर व पूनम ब्राम्हणे यांनी केले आहे.