वनदिनी ३० वनकर्मचारी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:47+5:302021-03-23T04:29:47+5:30

चंद्रपूर : जागतिक वनदिनाचे औचित्य साधून उपवनसंरक्षक कार्यालय मध्य चांदा वनविभाग येथे आयोजित कार्यक्रमात वनसंरक्षण व वनसंवर्धन करून अतुलनीय ...

Forest Day 30 forest workers honored | वनदिनी ३० वनकर्मचारी सन्मानित

वनदिनी ३० वनकर्मचारी सन्मानित

चंद्रपूर : जागतिक वनदिनाचे औचित्य साधून उपवनसंरक्षक कार्यालय मध्य चांदा वनविभाग येथे आयोजित कार्यक्रमात वनसंरक्षण व वनसंवर्धन करून अतुलनीय काम करणाऱ्या ३० वनकर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनरक्षक प्रीतमसिंह कोडापे, सहायक वनसंरक्षक अमोल गर्कल आदी उपस्थित होते. वन्यप्राणी शिकार प्रकरण, वनजमिनीवरील अतिक्रमण हटविणे, वनाचे आगीपासून संरक्षण करणे, उत्कृष्ट रोपवने तयार करणे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करणे व पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे, वनप्राण्यांच्या हालचालीचे संनियंत्रण करून मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजना करणे आदी कार्यासाठी काम करणाऱ्या वनरक्षक, वनपाल, वाहनचालक, कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी जागतिक वनदिनाचे महत्त्व, वनसंवर्धन, वनसंरक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Forest Day 30 forest workers honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.