शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

निलंबनाच्या कारवाईनंतर आता बदल्यांचे सत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 5:00 AM

मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर जाण्यास तयार नाही. त्यामुळे महामंडळाने १०० कामगारांची सेवा समाप्ती केली. तर ९६ जणांचे निलंबन केले. तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनात विलीनीकरणासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे महामंडळाने १०० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती तर ९६ जणांचे निलंबन केले होते. तरीही कर्मचारी संपावर येत नसल्याने आता महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू केले आहे. शनिवारी चंद्रपूर डिव्हिजनमधील आठ जणांची बदली करण्यात आली असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पाच डेपो येतात. त्यापैकी ब्रह्मपुरी डेपो हे गडचिरोली जिल्ह्यांतर्गत येते. तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर डेपोचा समावेश येतो. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये एकूण १३७२ कर्मचारी आहेत. मात्र, मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर जाण्यास तयार नाही. त्यामुळे महामंडळाने १०० कामगारांची सेवा समाप्ती केली. तर ९६ जणांचे निलंबन केले. तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता महामंडळाने या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी चंद्रपूर डिव्हिजनमधील प्रशासकीय विभागातील आठ जणांची बदली करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा कोणतेही कर्मचारी कामावर गेले नाही. महामंडळ कर्मचाऱ्यांमुळे संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. 

शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना अडचणकोरोनानंतर दोन वर्षांनंतर पहिली ते पाचवीच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. मात्र, महामंडळाचा संप सुरू असल्याने बसफेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात खासगी बसफेऱ्या धावत नसल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास मोठी अडचण होत आहे. यासोबत ज्येष्ठ व इतर प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

खासगी वाहनाकडून लूटकोरोनामुळे अनेक रेल्वे बंद आहेत. त्यानंतर महामंडळाच्या बसफेऱ्या बंद आहेत. परिणामी, खासगी ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत आहे. मात्र, हे खासगी वाहनधारक वारेमाप पैसे घेत आहेत; परंतु प्रवाशांना इतर कुठलेही साधन नसल्याने खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप