गोंडी धर्म तत्त्वांचे पालन करा
By Admin | Updated: October 20, 2015 01:24 IST2015-10-20T01:24:25+5:302015-10-20T01:24:25+5:30
गोंडीयन बांधवानी गोंडी धर्म तत्त्वांचे पालन करावे. आम्ही पेरसापेन शक्तीला मानणारे असून निसर्ग नियमानुसार तत्त्वाचे

गोंडी धर्म तत्त्वांचे पालन करा
चंद्रपूर : गोंडीयन बांधवानी गोंडी धर्म तत्त्वांचे पालन करावे. आम्ही पेरसापेन शक्तीला मानणारे असून निसर्ग नियमानुसार तत्त्वाचे पालन करून गोंडी धर्म, गोंडी भाषा, गोंडी संस्कृती व परंपरा जोपासून समाज संघटित करून संघर्ष करावा, असे आवाहन गोंडी भूमक संघाचे अध्यक्ष श्रीरावन इवनाते यांनी केले.
शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर राजगोंड (शेडमाके) यांच्या १५७ व्या शहिद दिन सप्ताहानिमित्त गोंडवाना गोटूल इंदिरानगर चंद्रपूर येथे आयोजीत पारंपरिक गोंडी धर्म पूजा कार्यक्रमात ते बोलत होते.
गोंडवाना गोटूल इंदिरानगर येथे विदर्भातून आलेले भूमक व समाजबांधवांच्या उपस्थितीत पारंपारिक गोंडी धर्म पूजा करून सुमरण पाटा, पेरसापेन पाटा व गोंडी मंत्रोच्चार पार पडले. याप्रसंगी बोलताना, श्रीरावन इवनाते यांनी गोंडी धर्म हा निसर्गनियमाच्या तत्वानुसार असून मातृशक्ती व पितृशक्ती हीच सर्वोच्च असून सर्वांनी त्याची सेवा करून समाजसेवा करावी, असे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोष मेश्राम, कुमुद जुमनाके, छाया तलांडे, सुनीता उईके, आशा सिडाम, सुशीला सुरपाम, छाया मसराम, आनंदा आत्राम, शीला कुळमेथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)