शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आयुष्य काळवंडले

By admin | Updated: March 6, 2015 01:14 IST

तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेक कोसंबी नं. १ (भिवकुंड चक) या गावात स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली नाही.

नीळकंठ नैताम पोंभुर्णातालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेक कोसंबी नं. १ (भिवकुंड चक) या गावात स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली नाही. गावकऱ्यांना फ्लोराईड युक्त पाणी पिऊन जगावे लागत असल्याने त्यांचे आयुष्यंच काळवंडले आहे. गावातील अनेक नागरिकांना कमरेचा आजार, दात व गुडघ्याचे आजार जडले आहेत. याकडे मात्र, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.पाणी म्हणजे जीवन, असे म्हटले जाते. मात्र याच पाण्यामुळे आता गावकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्ये गाव दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे.कुणी कमरेतून वाकले असून काहीना गुडघ्याचे विकार, दाताचे विकार तर कुणाला चालताना हात झटकणे आदी प्रकार या गावात दिसून येते. पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी नं. १ हे गाव तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर आहे. २०० ते ३०० लोकवस्तीचे हे गाव असून या ठिकाणी शंभर टक्के नागरिक दलित समाजाचे आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे येथील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि आता हेच पाणी नागरिकांना मरणाऱ्या दाढेत ढकलत आहे. याकडे आरोग्य विभागाने वेळीच लक्ष देऊन गावातील शुद्ध पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांची आहे.