रेल्वेने चिरडला शेळ्यांचा कळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:42 IST2019-06-28T22:42:28+5:302019-06-28T22:42:54+5:30
भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली.

रेल्वेने चिरडला शेळ्यांचा कळप
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली.
शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास शेळ्यांचा कळप रेल्वे गेटजवळच असलेल्या शेतात बसवून होता. अचानक या शेळ्यांवर कुत्रे भुंकायला लागले.
त्यामुळे शेळ्या घाबरून जवळच्याच रेल्वे रुळावर आल्या. त्याच वेळी संगमनेरी एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी तिथे आली. शेळ्यांना पळायला संधीच मिळाली नाही. त्यामुळे शेळ्यांचा कळप रेल्वेखाली चिरडला गेला. यात सुमारे ८० शेळ्यांचा कटून मृत्यू झाला. यात पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर शेळ्या चुनाळा येथील खासगी मालकीच्या असल्याचे म्हटले जात आहे.