महामार्गावरील चमकणारे लाईट गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST2021-09-09T04:33:45+5:302021-09-09T04:33:45+5:30

रणमोचन फाट्याला लागून असलेला रोड महापुरामूळे खराब झालेला होता. त्यामुळे या रस्त्यालगत आजतागायत मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते. ...

The flashing lights on the highway were stolen | महामार्गावरील चमकणारे लाईट गेले चोरीला

महामार्गावरील चमकणारे लाईट गेले चोरीला

रणमोचन फाट्याला लागून असलेला रोड महापुरामूळे खराब झालेला होता. त्यामुळे या रस्त्यालगत आजतागायत मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते. दोन - तीन व्यक्तिंना प्राणास मुकावे लागले तर काही लोकांना अपंगत्वसुद्धा आले आहे. अपघातावर प्रभुत्व मिळवण्यासाठी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी वेळीच या कंपनी अथवा डेप्युटी इंजिनियरसोबत चर्चा करून यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.

रात्रीच्या वेळी प्रवाशांना प्रवास करताना या ठिकाणाहून वाहने हळूवार चालविण्यात यावे व अपघात होऊ नये, यासाठी रेडियम पट्टीने बनवलेले व रात्री चमकणारे लाईट लावण्यात आले होते. मात्र, ते लाईट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.

080921\img-20210908-wa0114.jpg

महामार्गावरील चोरीला गेलेले विद्युत दिवे

Web Title: The flashing lights on the highway were stolen