विदर्भाचा ध्वज फडकला
By Admin | Updated: May 2, 2015 01:19 IST2015-05-02T01:19:00+5:302015-05-02T01:19:00+5:30
जनता महाविद्यालयात विदर्भाच्या ध्वजारोहणानंतर डॉ. अशोक जीवतोडे यांनी उपस्थितांना विदर्भाची प्रतीज्ञा दिली.

विदर्भाचा ध्वज फडकला
चंद्रपूर : जनता महाविद्यालयात विदर्भाच्या ध्वजारोहणानंतर डॉ. अशोक जीवतोडे यांनी उपस्थितांना विदर्भाची प्रतीज्ञा दिली. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी उपस्थित नागरिकांनी स्वाक्षऱ्या देऊन आपल्या भावना नोंदविल्या. राष्ट्रगिताने समारंभाची सांगता करीत लढा शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमात विविध संघटनांनी सहभाग घेतला. यात, चांदा शिक्षण प्रसार मंडळ, इको-प्रो, मुस्लीम अधिकार संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, ग्रीन प्लॅनेट, विठ्ठल मंदीर व्यायाम शाळा, फिमेल एज्युकेशन सोसायटी, जिल्हा बार असोसिएशन, विदर्भ माध्यमिक संघ, मुख्यध्यापक संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन, जिल्हा व्यवस्थापक मंडळ, विज्युक्टा, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, यंग टिचर असोसिएशन आदींसह विविध संघटनांचा समावेश होता. विविध पक्षाचे पदाधिकारी पक्षभेद विसरून एकत्र आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)