इटलीच्या इंटरनॅशनल मुद्राचित्रणात नवरगावच्या कलावंतांचा झेंडा

By Admin | Updated: October 1, 2014 23:21 IST2014-10-01T23:21:32+5:302014-10-01T23:21:32+5:30

इटलीच्या लॉमनॅगो येथील सातव्या इंटरनॅशनल एक्स लिब्रीज या मुद्राचित्रणाच्या प्रदर्शनासाठी नवरगाव (ता.सिंदेवाही) येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांच्या मुद्राचित्रणांची निवड

Flag of Novevagan artists in Italy's international currency | इटलीच्या इंटरनॅशनल मुद्राचित्रणात नवरगावच्या कलावंतांचा झेंडा

इटलीच्या इंटरनॅशनल मुद्राचित्रणात नवरगावच्या कलावंतांचा झेंडा

चंद्रपूर : इटलीच्या लॉमनॅगो येथील सातव्या इंटरनॅशनल एक्स लिब्रीज या मुद्राचित्रणाच्या प्रदर्शनासाठी नवरगाव (ता.सिंदेवाही) येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांच्या मुद्राचित्रणांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगभरातून ५२ देशांनी या प्रदर्शनासाठी ३७१ मुद्राचित्रे पाठविली. त्यात भारताकडून ३४ कलाकृती पाठविण्यात आल्या. पैकी ३१ कलाकृती एकट्या नवरगावच्या श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आहेत, हे विशेष.
त्यात ज्ञानेश्वर आत्राम, सोनाली अवचट, रश्मी बच्चूवार, संदीप चुन्ने, राष्ट्रपाल डांगे, अपुर्वा बरडे, शुभांगी देशमुख, रिया डोंगरवार, रूपाली दुबे, मंगेश गोटेफोडे, कुणाल गुज्जनवार, जयवंत कत्रोजवार, प्रणिता कविटकर, भूषण कोरेवार, सुनित लोहकरे, अश्विनी नखाते, सदानंद पचारे, कृपाली पडोळे, आभा पंचभाई, जीवन पराते, श्वेता पोईनकर, पूजा रापेल्लीवार, तुलसीदास सहारे, स्वप्नील शिवूरकर, सुरज तेलंग, आनंद वालदे, मयुर वांढरे, चंदा वनवे, नीलेश वरभे, स्वाती वासाडे यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर चित्रकृतींना स्थान मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लॉमनॅगो येथे प्रदर्शन सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Flag of Novevagan artists in Italy's international currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.