सावरगावात विविध ठिकाणी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:26+5:302021-02-05T07:37:26+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे लोक विद्यालय शाळा, आदिवासी सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत ...

सावरगावात विविध ठिकाणी ध्वजारोहण
सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे लोक विद्यालय शाळा, आदिवासी सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, महात्मा गांधी चौक, पर्वतकार चौक, हनुमान मंदिर चौक या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले.
लोक विद्यालय शाळा, आदिवासी सेवा सहकारी सोसायटी येथील झेंडावंदन पार पडल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील झेंडावंदन तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील झेंडावंदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय सहारे, गांधी चौकातील झेंडावंदन गावातील प्रतिष्ठित नागरिक मोरेश्वर ठिकरे, पर्वतकार यांच्या घराजवळील झेंडावंदन देविदास बोरकर, हनुमान मंदिर चौकातील झेंडावंदन प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. बुद्धविहार पटांगणावर गीतगुंजनाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. कवी व गायक निकेश अलोने, प्रशांत रामटेके यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कवी राजेश बारसागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ‘बाबासाहेब’ ही कविता सादर केली.