भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये चुका
By Admin | Updated: February 27, 2015 00:55 IST2015-02-27T00:55:47+5:302015-02-27T00:55:47+5:30
उच्च माध्यमिक परीक्षा मंंडळाच्या वतीने गुरूवारी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला.

भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये चुका
वरोरा : उच्च माध्यमिक परीक्षा मंंडळाच्या वतीने गुरूवारी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र, प्रश्न पत्रिकेत तीन गुणांसाठी एक प्रश्न चुकीचा विचारण्यात आल्याने अनेकांनी प्रश्न सोडविलाच नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविला नाही, त्यांना तीन गुणांचा फटका बसणार असल्याने प्रश्न सोडवणाऱ्या व न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट तीन गुण देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
भौतिकशास्त्र विषयाचा ७० गुणाचा पेपर गुरूवारी घेण्यात आला. यातील प्रश्न क्रमांक ३ मध्ये एकूण चार उपप्रश्न ७ गुणांसाठी विचारण्यात आले होते. या उप प्रश्नामधील क्रमांक ४ च्या प्रश्नात (ांङ्म१ २३ीी’ = 12 ७ 10 6/0 ूंल्ल ि८ ाङ्म१ २३ीी’ = 20 ७ 1010 ठ/े2) असे विचारण्यात आले होते. यात मोठा वाय ऐवजी लहान वाय छापण्यात आले. वरती अल्फा असल्याने व खाली गामा छापण्यात आल्याने विद्यार्थी चांगलेच संभ्रमात सापडले. छापण्यात चुक झाल्यामुळे काहीही करता विद्यार्थ्यांना या प्रश्नाची सोडवणूक करता आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन गुणापासून वंचित राहावे लागणार आहे. राज्यभरात हा पेपर झाल्याने भौतिकशास्त्राचा पेपर देणारे राज्यातील हजारो विद्यार्थी तीन गुणापासून वंचित राहणार असल्याचे मानले जात आहे. ही उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची चुक असल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्नामधील तीन गुण सरसकट देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)