लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर यांना ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यांच्या मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले.ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती शंभर टक्के लागू करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी, सामाजिक न्याय विभागामार्फत चालवल्या जाणाºया स्पर्धा परीक्षा, युपीएससी, एमपीएससी, प्रशिक्षण, स्किल डेव्हल्पमेंट प्रशिक्षण, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हींग प्रशिक्षण मोफत देण्यात यावे, बजेटमध्ये वसतिगृहासाठी निधीची तरतुद करुन त्वरीत बांधकाम करण्यात यावे, एससी, एस. टी. संवर्गातील मुलामुलींप्रमाणे सर्व स्पर्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत दिली जावी,ओबीसी समाजाच्या शेतकºयांना अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच योजनांचा लाभ देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात एकही टक्का मराठा समाज नसताना १६ टक्के जागा आरक्षित केल्या आहेत, व ओबीसी समाजाला केवळ ११ टक्के जागा आरक्षित आहे म्हणून राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी पूर्ववत करण्यात यावी इत्यादी मागण्या पूर्ण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त यांना दिले.जिल्हाधिकाºयांना निवेदन देणाºया शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष निकिलेश चामरे, संघटक जीवन गाडगे, राजेश सोयाम, उमंग हिवरे, शुभम पवार, तृप्तेश मासिरकर, रोशन पाचभाई यांच्यासह विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी समाजाच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:58 IST
ओबीसी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर यांना ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यांच्या मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले.
ओबीसी समाजाच्या समस्या सोडवा
ठळक मुद्देओबीसी विद्यार्थी शाखा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन