लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्तींकडून कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांना जिल्ह्यात येताच संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. यासाठी सर्व तालुकास्थळी कोविड केअर सेंटर उभारले आहे. सिंदेवाहीतदेखील असे सेंटर आहे. मात्र या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोणतीही सुरक्षा नाही. नियमाला तिलांजली देत एकाच खोलीत पाच ते सात जणांना ठेवले जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. एवढेच नाही तर अलगीकरणात असलेल्या व्यक्तीला बाहेरून जेवणाचा डब्बा येतो. यातून दारूचाही पुरवठा होत असल्याचीही माहिती आहे.सिंदेवाही तालुक्यात प्रशासनाने तीन विलगीकरण कक्ष उभारले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा समाजकल्याणचे मुलांचे वसतिगृहात असलेले कोविड केअर सेंटर आहे. शहरापासून चार किमी अंतरावर असल्याने वसतिगृहात प्रशासनाची पाहिजे त्याप्रमाणे व्यवस्था नसल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळले. या कोवीड सेंटरमध्ये रविवारी २४ व्यक्ती विलगीकरणात आहेत. पण एकाच खोलीत पाच ते सात जण राहत असल्याचे आढळले.या ठिकाणी प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था आहे. पण काही रूग्णांचे नातेवाईक जेवणाचा डब्बा घेवून येताना दिसले. त्यांचा उब्बा तपासासाठी सुरक्षा रक्षक किंवा पोलीस दिसले नाही. संपूर्ण सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्यांच्या नातेवाईकांचा मुक्तसंचार असल्याचे दिसले.या सेंटरमध्ये प्रशासनाने एक पोलीस नियुक्त केला आहे. पण तो राहत नसल्याने एखादा क्वारंटाईन केलेला रूग्ण पळाला तरी नवल वाटू नये, अशी अवस्था आहे. या सेंटरमध्ये नातेवाईका किंवा मित्रांच्या माध्यमातून जेवणाच्या डब्ब्यात दारूचा पूरवठा केला जात असल्याचीही माहिती आहे. एकूणच सिंदेवाहीतील या कोविड केअर सेंटरची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.मूलमध्ये फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जामूल: दिवसेंदिवस कोरोना रूग्णात वाढ होत आहे. येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असलेल्या अनेक व्यक्ती पॉझिटीव्ह आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाही मूलच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील एका खोलीत दोन ते चार व्यक्तींना ठेवण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग कधीच पाळला जात नसल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मूल येथील कर्मवीर महाविद्यालयातील सात खोल्यांमध्ये पुरूष तर पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. रविवारी १२ वाजेपर्यंत ३९ पुरूष संस्थात्मक विलगीकरण केंद्रात आहेत, तर ११ महिला आहेत. या केंद्रात सुरक्षा व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणावर नाही. काही दिवसांपूर्वी होमगार्डमार्फत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. परंतु सध्या त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे. बिहार येथून आलेला व पॉझिटिव्ह ठरलेला एक रूग्ण या केंद्रातून पळून गेला होता, हे विशेष.चिमुरात नियमांना तिलांजलीचिमूर : चिमूर तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरून येणाºया व्यक्तीसाठी शासनाच्या वतीने संस्थात्मक विलगीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील बºयाच केंद्रात कोरोनाच्या नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे पाहणीत दिसून आले. खडसंगी येथील विलगिकरण केंद्राला तर शंभर मीटर अंतराचा विसर पडल्याचे दिसून आले. असल्याचे दिसून येत आहे चिमूर येथे कोविड केअर सेंटरसह एक संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहे. या केंद्रात सध्या ४५ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. सोबतच खडसंगी, भिसी, नेरी, शंकरपूर, जांभूळघाट येथेही विलगिकरण केंद्र आहेत. चिमुरातील विलगीकरण केंद्रात नियमांना बगल दिली जात आहे. एका खोलीत दोन किंवा तीन व्यक्ती ठेवले जात आहे. कुणीही केंद्रात येऊन क्वारंटाईन व्यक्तीला जेवणाचा डबा देऊन जातात. मित्र भेटायला येतात. ग्रामीण भागातील केंद्रावर निगराणीसाठी शासनाचा कुणीच कर्मचारी राहत नाही. विलगीकरण केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कुणी जायला नको, असा नियम आहे. मात्र या नियमाला तिलांजली देण्यात येत आहे.चिमूर येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील खोल्या मोठ्या आहेत. त्यामुळे दोन व्यक्तीमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून बेड ठेवले आहेत. घरून जेवणाचा डब्बा आणणारे मोजके व्यक्ती आहेत. ते डब्बे प्रवेशद्वारावरच ठेवतात.-राकेश चौगुलेप्रशासकीय अधिकारी,नगर परिषद चिमूर
क्वारंटाईन सेंटरमध्ये एका खोलीत पाच ते सात जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST
या सेंटरमध्ये प्रशासनाने एक पोलीस नियुक्त केला आहे. पण तो राहत नसल्याने एखादा क्वारंटाईन केलेला रूग्ण पळाला तरी नवल वाटू नये, अशी अवस्था आहे. या सेंटरमध्ये नातेवाईका किंवा मित्रांच्या माध्यमातून जेवणाच्या डब्ब्यात दारूचा पूरवठा केला जात असल्याचीही माहिती आहे. एकूणच सिंदेवाहीतील या कोविड केअर सेंटरची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.
क्वारंटाईन सेंटरमध्ये एका खोलीत पाच ते सात जण
ठळक मुद्देजेवणाच्या डब्ब्यातून दारूचा पुरवठा : सुरक्षेसाठी असणारे पोलीसही गायब, क्वारंटाईन सेेंटरमध्येच नियम वाऱ्यावर