पाच जणांना कारावास
By Admin | Updated: May 19, 2017 01:10 IST2017-05-19T01:10:57+5:302017-05-19T01:10:57+5:30
स्थानिक रयतवारी कॉलरी येथे विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

पाच जणांना कारावास
पत्नीचा छळ : हुंड्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक रयतवारी कॉलरी येथे विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पैशासाठी विवाहितेला गंभीर जखमी करणाऱ्या पतीसह पाच आरोपींना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नाईकवाडे यांनी पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
शंकरदयाल राजम येलकलवार यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला १४ मार्च २०१२ रोजी तक्रार दिली की, त्यांची मुलगी सासुरवाडीला असताना पती क्रिष्णा उर्फ क्रिष्णास्वामी दुर्गया सल्लम (३०), श्रीनिवास दुर्गया सल्लम (३८), राधा श्रीनिवास सल्लम (३२), समुबाई दुर्गया सल्लम (५५) सर्व रा. रयतवारी कॉलरी यांनी तिला आपल्या आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करीत होते. घटनेच्या दिवशीसुद्धा आरोपींनी संगनमत करून तिला माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्याने आरोपींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देवून मारहाण केली. तिच्या पतीने तिच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
शंकरदयाल येलकलवार यांच्या या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.याप्रकरणी न्यायालयाने साक्षीदार तपासले.