पाच महिन्यांपासून अंगणवाडीसेविका मानधनाविना
By Admin | Updated: August 4, 2016 00:49 IST2016-08-04T00:49:41+5:302016-08-04T00:49:41+5:30
अंगणवाडी सेविकांना अल्पशे मानधन आणि ते देखील नियमित दिल्या जात नाही.

पाच महिन्यांपासून अंगणवाडीसेविका मानधनाविना
प्रशासनाप्रति रोष : लक्ष देण्याची मागणी
भद्रावती : अंगणवाडी सेविकांना अल्पशे मानधन आणि ते देखील नियमित दिल्या जात नाही. गेल्या पाच महिन्यापासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे अंगणवाडी महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे लक्ष देऊन मानधन अदा करण्याची मागणी अंगणवाडी महिलांनी केली आहे.
अंगणवाडी महिलांची सभा वनमाला टिकले यांचे अध्यक्षतेखाली भद्रावती येथे घेण्यात आली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात सीमा रोडे म्हणाल्या, गेल्या पाच महिन्यांपासून अंगणवाडी महिलांना मानधन देण्यात आले नाही. ज्या अंगणवाडीसेविका तसेच मदतनिस सेवानिवृत््त झाल्या, त्यांना घोषीत केल्यानुसार सेवानिवृत्तीचा लाभ एक लाख ७५ हजार रुपये दिला. तो तात्काळ देण्यात यावा, असे त्या म्हणाल्या. विद्या जांभुळे यांनी आभार मानले. (शहर प्रतिनिधी)