जुनासुर्ला ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र

By Admin | Updated: May 27, 2014 23:37 IST2014-05-27T23:37:30+5:302014-05-27T23:37:30+5:30

तालुक्यातील जुनासुर्ला येथील ग्रामपंचायत सदस्याकडे घर कर, पाणी कर, सफाई कर थकीत असल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी अपात्र घोषित केले आहे. सदस्यांमध्ये शामराव मेश्राम,

Five members of Junasurla Gram Panchayat disqualified | जुनासुर्ला ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र

जुनासुर्ला ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र

मूल : तालुक्यातील जुनासुर्ला येथील ग्रामपंचायत सदस्याकडे घर कर, पाणी कर, सफाई कर थकीत असल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी अपात्र घोषित केले आहे. सदस्यांमध्ये शामराव मेश्राम, वर्षा मडावी, राजेश गोवर्धन, संदीप गिरडकर यांच्यासह परिचारिका गोवर्धन यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ह) नुसार सदस्यांना अपात्र ठरविल्याने जुनासुर्ला गावात एकच खळबड उडाली आहे.

२0१0 रोजी जुनासुर्ला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत ९ सदस्य भाजपाचे तर दोन सदस्य काँग्रेसचे निवडून आले. विलास कलसार सरपंच व अजय खोब्रागडे यांची उपसरपंच म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालू असताना त्यांच्याच गटातील काही कार्यकर्त्यांनी अडीच वर्षातच सरपंच कलसार यांच्यावर अविश्‍वासाचा बंड पुकारला. त्यामुळे सरपंचांनी आपले पद वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अविश्‍वास प्रस्ताव फेटाळला परंतु पाच सदस्यांवर ग्रामपंचायतीची थकबाकी असल्याची तक्रार काहींनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. त्यानुसार पंचायत समिती स्तरावरुन चौकशी करून जिल्हाधिकार्‍याकडे तसा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांचे बहुमत नसल्याने जुनासुर्ला ग्रामपंचायत अल्पमतात आली आहे. सध्यातरी पाच सदस्यांची निवड होईपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकीय यंत्रणेकडे सोपविला जाईल, अशी चर्चा गावात सुरु आहे.

राजकारण आणि गटबाजीने एकमेकांना पाण्यात पाहण्यातच पाच सदस्यांचा बळी गेला आणि गावाचा विकास खुंटला, अशी चर्चा परिसरात नागरिकांमध्ये केली जात आहे.

(नगर प्रतिनिधी)

Web Title: Five members of Junasurla Gram Panchayat disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.