शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३२ लाखांच्या शेणखत खरेदी घोटाळ्यात पाच वनरक्षकांसह दोन वनपाल निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:13 IST

वनविभागात खळबळ : 'लोकमत'ने केले उघडकीस

गजानन ढवसलोकमत न्यूज नेटवर्कविरूर स्टेशन (चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रात जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३२ लाख ६८ हजारांच्या शेणखत घोटाळ्यात पाच वनरक्षकांसह दोन वनपालांना मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षकांनी तडकाफडकी निलंबित केल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

विरूरचे वनपाल संतोष संगमवार, सिद्धेश्वरचे इक्बाल शेख आणि चिंचोलीचे वनरक्षक गोपीचंद राठोड, विरूरच्या अश्विनी ताजने, सोंडा क्षेत्राच्या लक्ष्मी आडे, डोंगरगाव क्षेत्राचे ए. व्ही. मस्तान, सिद्धेश्वरचे वनरक्षक कुंडलिक कोळेकर, अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. 'लोकमत'ने हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर यापूर्वी आरएफओ सुरेश येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले होते. 

तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सीमेवरील विरूर वनपरिक्षेत्रात वृक्षलागवड केल्यानंतर वाढीसाठी शेणखत टाकण्याचे नियोजन होते. मात्र, जुलै ते नोव्हेंबर २०२४ मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी शेणखत खरेदी केली नाही. तत्कालीन अधिनस्थ वनपाल व वनरक्षकांशी संगनमत करून बनावट देयके सादर केली. त्याद्वारे विरूर २, चिंचोली ४, कविटपेठ २, भेंडाळा १, सोंडो २, सिद्धेश्वर २, डोंगरगाव १, अशा १४ गवत रोपवनात ३२ लाख ६८ हजार ६०८ रुपयांचा गैरव्यवहार केला. यासंदर्भात 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी चौकशीचा आदेश दिला.

दरम्यान, मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला. अहवालानुसार, दोषी आढळल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले होते. सोमवारी (दि. २) मुख्य वनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी विरूरचे वनपाल संतोष संगमवार, सिद्धेश्वरचे वनपाल इक्बाल शेख यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक बोड्डू यांनी २६ मे २०२५ रोजी वनरक्षक गोपीचंद राठोड, वनरक्षक अश्विनी ताजने, लक्ष्मी आडे, ए. व्ही. मस्तान, वनरक्षक कुंडलिक कोळेकर यांना निलंबित केल्याची माहिती वनविभागाने दिली. निलंबित वनाधिकाऱ्यांची संख्या एकूण आठ झाली आहे.

"मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर व मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या संयुक्त आदेशान्वये दोन वनपाल आणि पाच वनरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे."- एम. बी. दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी, विरूर स्टेशन 

टॅग्स :forest departmentवनविभागchandrapur-acचंद्रपूर