पाच कोटींच्या विकासकामांनी राजुराचा चेहरामोहरा बदलतोय-अरुण धोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:57+5:302021-02-05T07:35:57+5:30
राजुरा : आतापर्यंत २५ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत. ती विकासकामे शहराच्या सर्वांगीण विकासाची साक्ष देत असून या ...

पाच कोटींच्या विकासकामांनी राजुराचा चेहरामोहरा बदलतोय-अरुण धोटे
राजुरा : आतापर्यंत २५ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत. ती विकासकामे शहराच्या सर्वांगीण विकासाची साक्ष देत असून या वर्षात आणखी १० कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत घनकचरा व्यवस्थापनाने उत्तम व्यवस्थापन केले. १० ते १२ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रिया करून खत निर्मितीद्वारे डम्पिंग यार्डची जागा कचरामुक्त केली. राजुरा शहरातच सेप्टिक टँक मशीनची उपलब्धता करण्यात आली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून नदी पात्रातील इंटेकवेल विहिरीवर नवीन रोजपीस लावले.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण जसे कॉम्प्युटर ट्रेनिंग, शिवणकला इत्यादीतून २०० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षित केले. बचत गटांना बँकेचे कर्ज व अन्य मदत केल्यामुळे राजुरा शहरात २७० बचत गट कार्यरत आहेत, त्यात २७०० कुटुंब सहभागी आहेत, असेही धोटे यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजितसिंह संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, स्वीकृत सदस्य माजिद कुरेशी, नगरसेवक राधेश्याम अडानिया, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, नगरसेविका दीपा करमनकर, शारदा देवीदास टिपले, गीता भारत रोहने, वज्रमाला अजय बतकमवार, साधना भाके, गीता भारत रोहने, संध्या चंद्रशेखर चांदेकर, संतोष गटलेवार, संतोष शेंडे, अशोक राव उपस्थित होते.