वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST2021-07-23T04:17:59+5:302021-07-23T04:17:59+5:30
फोटो घुग्घुस : विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा - पैनगंगा नदीचा संगम व उत्तर वाहिनीवर असलेल्या वढा तीर्थक्षेत्राच्या ...

वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाच कोटी
फोटो
घुग्घुस : विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा - पैनगंगा नदीचा संगम व उत्तर वाहिनीवर असलेल्या वढा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वढा येथे केली.
आषाढी एकादशीनिमित्त वढा पैनगंगा नदीचा संगम उत्तर वाहिनीच्या काठावर विठ्ठल रखुमाईचे पुरातन मंदिर असून विदर्भातील लहान पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. दूरवरून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येथे येतात. मात्र कोरोनामुळे अत्यल्प भाविकांनी यावेळी हजेरी लावली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वढा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराला भेट देऊन विधिवत पूजा केली. यावेळी वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. विकासासाठी त्याहीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. किशोर जोरगेवार, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, घुग्घुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, काँग्रेस किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग सेलचे जिल्हा अध्यक्ष पवन आगदारी, कृषी बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, कामगार नेते अनवर सय्यद यांची उपस्थिती होती.