दारूसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST2021-05-19T04:29:12+5:302021-05-19T04:29:12+5:30

बल्लारपूर : येथील दीनदयाल वाॅर्डात दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मंगळवारी मोक्याच्या ठिकाणी पहाटे धाड टाकली. यामध्ये ६९ ...

Five and a half lakh items including liquor confiscated | दारूसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

दारूसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बल्लारपूर : येथील दीनदयाल वाॅर्डात दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मंगळवारी मोक्याच्या ठिकाणी पहाटे धाड टाकली. यामध्ये ६९ हजारांची देशी दारू व ५ लाखांची महिंद्रा बोलेरो, असा ५ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

करोनाकाळात मोठ्या प्रमाणात शहरात दारू तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मागील दोन आठवड्यांत पोलिसांचे हे तिसरे धाड सत्र असून दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत आकाश आनंद डांगोरे रा. पंडित दीनदयाळ वाॅर्ड, बल्लारपूर याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत कलम ६५ (ई)प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, पोलीस हवालदार आनंद परचाके, रणविजय ठाकूर, एनपीसी शरद कुदे, सुधाकर वरघने, दिलीप आदे, शेखर माथनकार, महिला शिपाई सीमा पोराते यांनी केली.

Web Title: Five and a half lakh items including liquor confiscated