बल्लारपूर हागणदारी मुक्तीत विदर्भात प्रथम
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:13+5:302016-04-03T03:50:13+5:30
बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला.

बल्लारपूर हागणदारी मुक्तीत विदर्भात प्रथम
१०० टक्के उदीष्ट पुर्ण : १७ ग्राम पंचायतींचा समावेश
बल्लारपूर : बल्लारपूर पंचायत समितीची स्थापना १४ मार्च २००२ रोजी करण्यात आली. यात एकूण १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. तालुक्यातील कुटुंब संख्या ९८६४ असून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून वापरात आणले आहेत. पहिल्या टप्प्यातील उदिष्ट पूर्ती झाल्याने संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त झाला आहे. बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्तीत विदर्भात पहिला असल्याची माहिती शनिवारी संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आले यासाठी पदाधिकारी अधिकारी संपर्क अधिकारी व जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून करण्यात आला. यासाठी पदाधिकारी अधिकारी व गावकरी यांच्याशी सलग सात महिन्यापासून संवाद साधला जात होता. लोकसहभाग घेण्यात आला लोकांना शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करण्यात आले. शौचालयाचा नियमित वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी भल्या पहाटे गुड मार्निंग पथकाच्या माध्यमातून गावागावांत जागृती अभियान राबविण्यात आले यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे सहकार्य वेळोवेळी घेण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचे ध्येय गाठण्यासाठी स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हागणदारी मुक्त तालुक्याचे पहिल्या टप्प्यातील यश मिळाले. तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतीने हागणदारी मुक्तीचे ग्रामसभेचे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले. फेब्रुवारीमध्ये एकूण ९८६४ कुटुंबाची शौचालय बांधकाम व नियमित वापरासंदर्भातील प्रक्रिया आॅनलाईन करुन शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी दिली.बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र जबाबदारी वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यातील ग्रामपंचायतीची घोषणा करण्याचे धोरण आहे. विविध योजनांची माहिती देण्यासह उघड्यावर शौचास जाणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आधार घ्यावा लागणार आहे. गुडमार्निंगपथकाच्या माध्यमातून गावपातळीवर निरंतर प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)