वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली मूलची पहिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:10+5:302021-02-05T07:37:10+5:30
मूल : कोरोनामुळे २०२० हे वर्ष सर्वाना भीतीदायक ठरले होते. कोरोनाची लस जानेवारी महिन्यात येईल, असा अंदाज होता. हा ...

वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली मूलची पहिली लस
मूल : कोरोनामुळे २०२० हे वर्ष सर्वाना भीतीदायक ठरले होते. कोरोनाची लस जानेवारी महिन्यात येईल, असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला असून मूल येथेही लस पोहचली आहे. या लसीचे पहिले मानकरी ठरले मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वल इंदुरकर.
मूल येथे कोविड लस आल्यानंतर त्या लसीविषयी गैरसमज दूर व्हावा व जनतेत लसीविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी डॉ. इंदूरकर यांनी लस घेतली. यावेळी मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, पोलीस उपविभागीय अधिकारी अनुज तारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे, भाजप शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते तसेच संपूर्ण वैद्यकीय चमू उपस्थित होती.