शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात पुन्हा गोळीबार; कुख्यात गुंड हाजी सरवरची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या

By परिमल डोहणे | Updated: August 12, 2024 20:46 IST

चंद्रपूर हादरले; शहरातील मध्यभागी असलेल्या बिनबा गेट परिसरातील थरार

चंद्रपूर : गोळीबाराने चंद्रपूर जिल्हा हादरला असतानाच भर दुपारी शहरातील बिनबा गेट परिसरात असलेल्या हॉटेल शाही दरबारमध्ये चंद्रपुरातील कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्यानंतर हाजी सरवर हॉटेलमधील किचनकडे पळू लागला. यावेळी त्याला चाकूने भोसकले. तो खाली कोसळताच त्याचा चाकूने गळा चिरला. यावेळी हाजीच्या साथीदारालाही एक गोळी लागली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. रक्तबंबाळ अवस्थेत हाजीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे चंद्रपूर शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. सततच्या गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती आहे.

सोमवारी दुपारी शहरातील शाही दरबार हॉटेलमध्ये हाजी सरवर आपल्या साथीदारांसह जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण करत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात हाजी याला दोन गोळ्या लागल्या. तशाच अवस्थेत तो हॉटेलमधील किचनकडे पळू लागला. यावेळी त्या आरोपींनी हॉटेलमध्ये प्रवेश करून त्याच्यावर चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळला. यावेळी आरोपींनी चाकूने त्याचा गळा चिरला. अन् घटनास्थळावरून पळ काढला. हॉटेल चालकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान तेथील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोंडावार, शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसीफराजा शेख व पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठले होते.बॉक्स

कोण होता हाजी सरवर?

कोळसा माफियातील कुख्यात गुंड म्हणून हाजी सरवरची विदर्भात ओळख होती. त्याच्या जिल्ह्यातील विविध ठाण्यांत खंडणी वसुली, हत्या, सुपारी देऊन मारपीट करणे, आरोपींना शरण देणे आदी गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपार, मोक्कासारखी कडक कारवाईसुद्धा झाली होती. मागील काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीचे साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस