अंत्यसंस्कारासाठी घराघरांतून गोळा करावी लागतात लाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:45+5:302021-03-24T04:25:45+5:30
: चिमूर तालुक्यात जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यसंस्काराला लाकडे उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत ...

अंत्यसंस्कारासाठी घराघरांतून गोळा करावी लागतात लाकडे
: चिमूर तालुक्यात जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यसंस्काराला लाकडे उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत १७४ गावे येतात. ही सर्व गावे चिमूर, शंकरपूर, भिसी, खडसंगी, मुरपार या पाच वनक्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागल्या गेली आहेत. या पाचही ठिकाणी मागील दीड वर्षापासून जळाऊ लाकडे उपलब्ध झालेली नाही. शंकरपूर, भिसी, जांभूळघाट, खडसंगी, वडाळा, मुरपार, साठगाव, आंबोली आदी दोन हजार लोकसंख्येपेक्षा मोठी गावे आहेत. या गावांत कोणाचा मृत्यू झाल्यास प्रेताला जाळण्यासाठी लाकडेच उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांना वणवण भटकावे लागते. घरोघरी फिरून लाकडे जमा करावी लागतात. काही नातेवाईक जंगलालगत असलेल्या गावांतून लाकडे विकत घेतात. ती विकत घेतलेली लाकडे ट्रॅक्टरच्या साह्याने आणावे लागत असल्याने मृतकाच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंंड सोसावा लागत आहे. या पाचही क्षेत्रीय कार्यालयांत कमीतकमी अंत्यसंस्कारासाठी तरी लाकडे वनविभागाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
पाचही वनक्षेत्रीय कार्यालयांत जळाऊ लाकडे उपलब्ध नाही. जळाऊ लाकडांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केलेली आहे. मागणीची पूर्तता झाल्यानंतर वनक्षेत्र कार्यालयांना पुरवठा करण्यात येईल.
- भाविक चिवंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिमूर