शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सात दिवसांपासून धगधगतोय चंद्रपुरातील वेकोलिचा कोलडेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 4:22 PM

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी व सास्ती उपक्षेत्रातील कोलस्टॉक डेपोमध्ये मागील सहा दिवसांपासून आग धगधगत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोवरी व सास्ती उपक्षेत्रातील कोलस्टॉक डेपोमध्ये मागील सहा दिवसांपासून आग धगधगत आहे. शनिवारीच या डेपोंना आग लागली. वेकोलि अधिकाऱ्यांनी याबाबत माहित होताच आग विझविण्याचा थातूरमातूर प्रयत्न केला. त्यामुळे ही आग सहाव्या दिवशीही धगधगत आहे. यात वेकोलिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.सहा दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही वेकोलि प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचललेले नाही. बल्लारपूर वेकोलि क्षेत्राअंतर्गत जवळपास सहा ते सात उपक्षेत्र असून, या क्षेत्रात उच्च दर्जाचा कोळसा उत्पादित केला जातो. जानेवारी ते मे या कालावधीत प्रत्येक उपक्षेत्राला कोळशाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट दिले जाते. या कालावधीला उत्पादनाचे ‘सिझन’ असे संबोधले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त कोळसा उत्पादित केला जातो. गोवरी आणि सास्ती उपक्षेत्रात अंदाजे साडेतीनशे टन कोळशाचा साठा असल्याची माहिती आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. या वाढत्या तापमानामुळे कोलस्टॉकला आपोआप आग लागत असते, असे वेकोलि अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे १९ मेच्या रात्री सास्ती व गोवरी क्षेत्रातील कोलस्टॉकला अशीच आग लागल्याचे सांगितले जाते. परंतु, ती आग पूर्णत: विझविण्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे या आगीची धग आजही कायम असून राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.याबाबत वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही आग वरच्या भागाला लागली असून, कोळशाचा ढिगारा मशिनच्या साहाय्याने वेगळा करून पाण्याच्या बुलेट फायरद्वारा मारा केल्याने आग क्षणात विझविता येते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, आज आठ दिवसांचा कालावधी लोटूनही या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे वेकोलिचा अंदाजे ३५० लाख टन कोळसा जळून खाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोलस्टॉकला आग लागणे म्हणजे अधिकाऱ्यांना गैरप्रकार करण्याची संधी मिळणे आहे. म्हणूनच या आगीकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :fireआग