चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग
By Admin | Updated: June 11, 2015 01:28 IST2015-06-11T01:28:24+5:302015-06-11T01:28:24+5:30
बाबुपेठ परिसरातील राज इंटर प्रायजेस या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले.

चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग
२५ लाखांचे नुकसान : तीन तासांनंतर आग आटोक्यात
बाबुपेठ (चंद्रपूर) : बाबुपेठ परिसरातील राज इंटर प्रायजेस या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. आग विझवण्यासाठी अग्नीशमक दलाच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियत्रंन मिळवता आले. मात्र तोवर दुकानातील सर्व इलेक्ट्रानीक साहित्य जळुन खाक झाल्याने जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले आहे.
अब्दुल हमीद चौकात मागील अनेक वर्षापासून राज इंटरप्रायजेज हे इलेक्ट्रानीकचे दुकान आहे. याच दुकानाच्या इमारतीत आरके इलेक्ट्रॉनिकचेही दुकान आहे. संतोष कांबळे, रवी कांबळे आणि राजेश कांबळे हे तीन भाऊ मिळून हा व्यवसाय चालवतात. दरम्यान बुधवारी सकाळी गस्तीवर असलेल्या शहर ठाण्यातील पोलीस पार्टीला इलेकट्रॉनिक दुकानातून धूर निघत असल्याचे दिसले.
पाहता पाहता या आगीने भीषण स्वरुप धारण केले. या घटनेची माहिती अग्नीशामक दलाला देण्यात आली. लगेच फायर ब्रिगेडचे तीन वाहन आणि ताफा घटनास्थळी दाखल झाले.
आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल तीन तासाचा कालावधी लागला. त्यामुळे दुकानातील इलेट्रीक सामान तसेच टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज, फॉन मिक्सर, कुलर इत्यादी वस्तू जळुन खाक झाल्या आहे.
अगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही. आग शॉट सक्रीटमुळे लागल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत २५ लाखाहून अधिक नुकसान झाले असल्याची माहिती असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. (वार्ताहर)