सावली येथील डम्पिंग यार्डला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:22+5:302021-04-01T04:29:22+5:30
सावली : सावली येथील प्रभाग क्रमांक १६ सिद्धार्थनगरलगत नगर पंचायतने तयार केलेल्या डम्पिंग यार्डला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारच्या ...

सावली येथील डम्पिंग यार्डला आग
सावली : सावली येथील प्रभाग क्रमांक १६ सिद्धार्थनगरलगत नगर पंचायतने तयार केलेल्या डम्पिंग यार्डला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
नगर पंचायतचे कर्मचारी, गावकरी व बाहेरून पाचारण केलेल्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
नगरातील ओला व सुका कचऱ्याचे संकलन करण्यासाठी अगदी नगरालगत डम्पिंग यार्डची निर्मिती * * * * * * * * * * * * * * * * * *नगर प्रशासनाने केली आहे. कचऱ्यासोबतच गोळा झालेले प्लास्टिक जमिनीत न पुरता जाळल्याने डम्पिंग यार्डला आग लागल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपूर्वीही याच डम्पिंग यार्डला आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राटदार व * * * * * * * * * * * * * * * *नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नगराला लागून डम्पिंग यार्ड, आहे हे मात्र विशेष. लवकरच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.