झरण वनपरिक्षेत्रात आगीने वनसंपदा जळून खाक
By Admin | Updated: April 20, 2016 01:18 IST2016-04-20T01:14:33+5:302016-04-20T01:18:26+5:30
वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून वनवा लागला असून यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली.

झरण वनपरिक्षेत्रात आगीने वनसंपदा जळून खाक
हजारो हेक्टर जंगल नष्ट : वनकर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
आक्सापूर: वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून वनवा लागला असून यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली. आगीने परिसरातील हजारो हेक्टरवरील जंगल विळख्यात घेतले.
झरण वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कक्ष क्र. १२१ व ११९ या क्षेत्रात आगीने संपूर्ण जंगल जळून खाक झाले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवानाचे रोपवन केलेली वृक्षे आहेत. सोबतच बांबुचे रांझे या क्षेत्रात अधिक आहेत. या आगीमुळे हे सर्वच रांझे जळून खाक झाले आहेत. इतर मौल्यवान वनस्पतीसुद्धा नष्ट झाली.
या जंगलात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामध्ये वाघ, अस्वल व इतर प्राणीसुद्धा या वास्तव्याला आहेत. या आगीमुळे हे वन्यप्राणीसुद्धा होरपळले असण्याची शक्यता असून ते गावाच्या दिशेने येण्याची दाट शक्यता आग विझवण्याचे काम फक्त वनमजुरावर सोपवून वनकर्मचारी कमालिचे दुर्लक्ष करतात.
या क्षेत्रात आगी लागल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापूर्वी सुद्धा ते ११६, १२४ मध्ये आग लागली होती. (वार्ताहर)