बल्लारपूर वनविभाग परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:37 IST2021-02-27T04:37:34+5:302021-02-27T04:37:34+5:30

बल्लारपूर : येथील वनविभागातील भामरागड रेंजमध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली, ...

Fire in Ballarpur forest area | बल्लारपूर वनविभाग परिसरात आग

बल्लारपूर वनविभाग परिसरात आग

बल्लारपूर : येथील वनविभागातील भामरागड रेंजमध्ये शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे कळले नाही.

ही आग दोन तासांत आटोक्यात आली. यात पेपरमिल व राजुरा येथील अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. ही आग परिसरातील कचऱ्याला लागली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग कचऱ्याला लागली असल्यामुळे वेळेच्या आधीच आटोक्यात आली. त्यामुळे यात वनविभागाचे कुठलेही नुकसान झाले नाही, अशी माहिती येथे नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी चन्ने यांनी दिली. आगीची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी मुंडे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, तहसीलदार राईनचवार आणि उपमुख्याधिकारी जयवंत मोटघरे यांनी परिसराची पाहणी केली.

Web Title: Fire in Ballarpur forest area