स्वयंसेवी संस्थांतर्गत वसतिगृह कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:09+5:302021-02-20T05:23:09+5:30

राज्यातील वसतिगृहांमध्ये अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस व चौकीदार या पदावर ८ हजार १०४ जण कार्यरत आहेत. अधीक्षक ९ हजार २००, ...

Financial dilemma of NGO hostel staff | स्वयंसेवी संस्थांतर्गत वसतिगृह कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी

स्वयंसेवी संस्थांतर्गत वसतिगृह कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी

राज्यातील वसतिगृहांमध्ये अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस व चौकीदार या पदावर ८ हजार १०४ जण कार्यरत आहेत. अधीक्षक ९ हजार २००, स्वयंपाकी ६ हजार ९००, मदतनीस आणि चौकीदार यांना प्रत्येकी ५ हजार ७५० या मानधनावर ही मंडळी चोवीस तास कर्तव्य बजावत आहे. तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांना कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. वेतनही वेळेवर मिळत नाही. यामध्ये आर्थिक अडचणींची सामना करावा लागत आहे.

कोट

शासनाच्या समान काम, समान वेतन या धोरणानुसार राज्यातील अनुदानित वसतिगृह कर्मचारी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शंभर टक्के वेतनश्रेणीची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी आहे. मुख्यमंत्री यांनी याबाबत बैठक घेऊन या मागणीचा विचार करायला हवा.

- गीता गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक्षक व इतर कर्मचारी संघटना, चंद्रपूर.

Web Title: Financial dilemma of NGO hostel staff