समस्याग्रस्त विधवा, निराधार महिलेला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:54+5:302021-02-23T04:43:54+5:30

घुग्घुस : येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील भागरथा भीमराव सिडाम यांच्या घराला आग लागून घरातील साहित्य, ...

Financial assistance to a troubled widow, destitute woman | समस्याग्रस्त विधवा, निराधार महिलेला आर्थिक मदत

समस्याग्रस्त विधवा, निराधार महिलेला आर्थिक मदत

घुग्घुस : येथील अमराई वॉर्ड क्रमांक १ मधील भागरथा भीमराव सिडाम यांच्या घराला आग लागून घरातील साहित्य, अन्नधान्य जळून खाक झाले. त्या निराधार झालेल्या विधवेला नव एकता जय सेवा बहुद्देशीय संस्था, चांदागडच्या वतीने आर्थिक व वस्तू रुपात मदत देऊन सहकार्य केले.

९ ऑगस्टला विधवा व निराधार असलेल्या वृद्ध महिला मोलमजुरीकरिता बाहेर गेली असता शॉर्टसर्कीटमुळे आग लागून तिचे घर पूर्णपणे जळून राख झाले. त्या निराधार व विधवा महिलेला आर्थिक व वस्तू रुपात मदत दिली.

यावेळी मनीष आत्राम, गणेश किनाके, दीपक पेंदोर, अंकुश उईके, शैलेंद्र सलामे, लतीश आत्राम, मनोज चांदेकर, अरविंद किवे, संदीप तोंडासे, तिरुमाय सुनीता आत्राम, विद्या आत्राम व समाज बांधवांची उपस्थिती होती.

Web Title: Financial assistance to a troubled widow, destitute woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.