वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST2021-07-12T04:18:32+5:302021-07-12T04:18:32+5:30
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत - पुनर्वसन विभागामार्फत वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात ...

वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना आर्थिक मदत
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत - पुनर्वसन विभागामार्फत वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते. ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी असलेले पिंटू मोतीलाल राऊत व गुंजविना पिंटू राऊत हे १८ सप्टेंबरला ब्रह्मपुरी येथून पारडगाव येथे दुचाकीने जात असताना त्यांच्या धावत्या दुचाकीवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता, तर तळोधी खुर्द येथील अरविंद तिजारे यांचा गोगाव शेतशिवारात वीज पडून मृत्यू झाला होता.
मृत व्यक्तींचे वारस कुसुम मोतीलाल राऊत व पार्षद पिंटू राऊत (रा. पारडगाव) यांना एकूण ८ लाख रुपये व वर्षा अरविंद तिजारे (रा. तळोधी, खुर्द) यांना ४ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, माजी सभापती नेताजी मेश्राम, माजी सरपंच जयपाल पारधी, मुन्ना रामटेके यांची उपस्थिती होती.