...अखेर वेकोली मैदानाची युवकांनीच केली साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST2021-09-16T04:34:01+5:302021-09-16T04:34:01+5:30

याबाबत वेकोली परिसरातील नागरिकांनी अनेकदा नगरपालिकेला तक्रार नोंदवली. अनेकदा मैदान सफाईची मागणी केली. पण पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. ...

... Finally, the Wekoli ground was cleaned by the youth | ...अखेर वेकोली मैदानाची युवकांनीच केली साफसफाई

...अखेर वेकोली मैदानाची युवकांनीच केली साफसफाई

याबाबत वेकोली परिसरातील नागरिकांनी अनेकदा नगरपालिकेला तक्रार नोंदवली. अनेकदा मैदान सफाईची मागणी केली. पण पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. नागरिकांनी ही समस्या युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांना सांगताच त्यांनी युवकांच्या सहभागातून मैदान साफ करण्याचे आश्वासन दिले व त्यांच्या हाकेला ओ देत ग्रीन गोंडवाना बहुदेशीय संस्था, बल्लारपूर क्रिकेट ॲकेडमी, न्यू माइन्स गणेश मंडल, बाल गणेश मंडल यांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सलग दोन आठवडे मैदान सफाई अभियान राबवून वेकोलीच्या त्या मैदानाची साफसफाई केली. यावेळी सुनील मोतीलाल, मेहबूब ख़ान, शशी पोटेवार, बाला वर्मा, रवी वर्मा, लाला वर्मा, किरण नामस्वामी, वसीम खान, रोहित वर्मा, सुमित वर्मा, राजेश वर्मा, रोहित सक्सेना, शुभम केशकर, अदलिया वर्मा, राहुल वर्मा, प्रेम वर्मा, आदित्य प्रजापति, भोला निषाद व इतर युवकांचे विशेष सहकार्य लाभले.

150921\img-20210914-wa0255.jpg

वेकोली मैदान साफसफाई करणाऱ्या चमुसोबत चेतन गेडाम

Web Title: ... Finally, the Wekoli ground was cleaned by the youth